उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुका ग्रामीण भागातून काँग्रेस पक्षाचे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्याचे होत असलेले बेहाल, महागाई, गॅस दरवाढ़, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेती आजारांची दरवाढ, शेतकरी विरोधी तीन काळे कायदे बनवून उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय, केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या विमा कंपन्यानी अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही पिकविमा न देण्याचे घेतलेले निर्णय या बाबत जनजागरण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नियोजित केलेले जनजागरण अभियान उस्मानाबाद तालुक्यात महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराजजी पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष अँड. धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागरण रथाचे मार्गक्रमण होणार आहे.यावेळी रथासोबत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील मान्यवर, महिला काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, युवक काँग्रेस, मागासवर्गीय सेल, ओबीसी सेल, सेवादल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता करजखेडा येथे जनजागरण अभियान रथाचे आगमन होणार आहे. यावेळी जनतेशी संवाद साधून केंद्र सरकारमुळे वाढलेली महागाई व चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्याचे होत असलेले हाल याबाबत संवाद साधण्यात येणार आहे. सकाळी 10.00 वाजता पाटोदा, 11.00 वा. बेंबळी, 12.00 वा. कनकरा, 1.00 वा. टाकळी (बॅ.), 4.00 वा. पाडोळी (आ.). 5.00 वा. मेंढा, 6.00 वा. घुग, 7.00 वा. लासोना, 8.00 वा. समुद्रवाणी व तेथे मुक्काम राहील.

दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वा. सांगवी, 9.00 वा. दाऊतपूर, 11.00 वा इल 12.00 वा. काजळा, 1.00 वा. वाणेवाडी, 4.00 वा. तेर, 5.00 वा. गोवर्धनवाडी, 6.00 वा. ढोकी अशा प्रकारे जनजागरण रथाचे मार्गक्रमण होणार आहे. तरी ग्रामीण भागातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने आपापल्या भागात उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे यांनी केले आहे. 


 
Top