तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पादुकांना पंढरपूर येथील चंद्रभागा नदित स्नान घालण्यात आले.

 श्री.संत गोरोबा काका यांच्या पालखीचे कार्तिक सोहळ्यासाठी पंढरपूरला तेरहून सहा नोव्हेंबरला प्रस्तान झाले. पालखी  हिंगळजवाडी ,उस्मानाबाद,भातंबरे ,वैराग, यावली, खैराव ,अनगर ,रोपळे या गावी मुक्काम करून पालखी पंढरपूरला 14  नोव्हेंबरला सकाळी पोहोचली. पंढरपूरला चंद्र भागा नदिच्या तिच्यावर  पालखी पोहोचल्यावर श्री.संत गोरोबा काका यांच्या पादुकांना चंद्रभागा नदित स्नान घालण्यात आले.श्री.संत गोरोबा काका यांची पालखी पंढरपूरला आल्याचे समजताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

 
Top