उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नोव्हेंबर 2021 महिन्यात देशभरात त्रिपुरा राज्यात तसेच महाराष्टातील अमरावती, मालेगाव या गावांत समाजातील दोन वर्गात तेढ निर्माण करणाऱ्या अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे  कायद्याच्या मर्यादेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगण्याचे आवाहन  पोलीस अधीक्षक श्रीमती- नीवा जैन यांनी जनतेस केले आहे.

 हल्ली सामाजिक माध्यमांचा वापर अगदी खेडेगावापर्यंत होत असून या घटनां संबंधी सामाजिक माध्यमांमध्ये वेगवेगळ्या अंगाने प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. सायबर पोलीस ठाण्यामार्फत अशा सामाजिक प्रसार माध्यमांचे पोलीस नियमीत अवलोकन करत आहेत.अशा प्रतिक्रीयांपैकी काही अनुचित प्रतिक्रीयांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होउन सामाजिक शांतता धोक्यात येउ शकते. परिणामी अशा घटनांवर प्रतिक्रीया देताना कायद्याच्या कक्षेंतर्गत आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करुन आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगावे,असे आवाहन उस्मानाबाद पोलीस दलातर्फे   पोलीस अधीक्षक श्रीमती- नीवा जैन यांनी जनतेस केले आहे.


 
Top