तुळजापूर / प्रतिनिधी-

 जवाहर नवोदय विद्यालयातील श्री सूर्यकांत गायकवाड (इंग्रजी विषय ),श्री चक्रपाणी गोमारे, (सामाजिक विज्ञान विषय) , हरी जाधव (मराठी विषय )यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, नवी दिल्ली (CBSE) परीक्षेत आपल्या विषयांमध्ये अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल तसेच विद्यार्थी विशेष प्रावीण्य प्राप्त करून दिल्यामुळे या शिक्षकांचा नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्लीचे कमिशनर श्री विनायक गर्ग यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे. 

ही प्रमाणपत्रे विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांच्या हस्ते शिक्षकांना प्रदान करण्यात आली. त्यावेळी प्राचार्य म्हणाले ही तुमच्या कार्याची  उत्कृष्ट पोच पावती आहे अशाच पद्धतीचे विद्यार्थ्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी अविरत प्रयत्न करत रहा .हे सांगून शिक्षकांना भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच काही पालक उपस्थित होते. या सर्वांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले.  सूत्रसंचालन   एस जीभोरगे यांनी केले.

 
Top