तेर / प्रतिनिधी  

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरहून कार्तिक सोहळा करून 28 नौव्हेबरला तेरला आगमन होताच भाविकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे तेरहून पंढरपूरला 6 नौव्हेबरला प्रस्थान झाले.कर्तिक सोहळा करून 28 नौव्हेबरला तेरला पालखीचे आगमन झाले.तेरमध्यै पालखीचे आगमन होताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.श्री.संत गोरोबा काका यांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी तेर येथील ग्रामसेवा संघाच्या वतीने मंदिर व परिसरात दिपोत्सवाचै आयोजन केले होते.याचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने भाविकभक्त उपस्थित होते.दिपोत्सव साजरा करण्यासाठी बालाजी भक्ते , तानाजी पिंपळे,केशव सलगर, नवनाथ पांचाळ,नरहरी बडवे, माधव मगर, गोपाळ थोडसरे,रेवणसिद्ध लामतुरे, दिपक खरात,समिर बनसोडे,सारंग पिंपळे, भगवंत सौदागर,विजय थोडसरे, ज्ञानेश्वर खरात,आनंद मोरे व भाविकांनी परीश्रम घेतले.


 
Top