उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्य परिवहन महामंडळच्या उस्मानाबाद बस आगावरातील व्यवस्थापक- पांडुरंग मच्छिंद्र पाटील हे दि. 27.11.2021 रोजी 12.00 वा. सु. कर्तव्यावर असतांना उस्मानाबाद- तुळजापूर प्लॅटफॉर्म वरील बस सोडत होते. यावेळी उस्मानाबाद आगारातील वाहक- दत्ता सुखदेव माने, शंकर रामराव पडवळ व चालक- गणेश भगवान मंडोळे यांनी तेथे आंदोलकरण्यासाठी हजर राहून पांडुरंग पाटील यांना शिवीगाळ करुन मारहान करुन ठार मारण्याची धमकी देउन पाटील यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन पांडुरंग पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506, 34 अंतर्गत आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
Top