तुळजापूर/ प्रतिनिधी-

“शासन आपल्या दारी” या संकल्पनेनुसार ‘मिशन वात्सल्य’ योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार तुळजापूर तालुका  मिशन वात्सल्य समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.  समितीचे अध्यक्ष तहसिलदार सौदागर तांदळे व समिती सचिव बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीकांत हावळे यांनी या महत्वपूर्ण असलेल्या समिती सदस्य पदी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे यांची निवड केल्याचे पत्राद्वारे जाहीर केले. 

निवडी नंतर गणेश चादरे म्हणाले की, तुळजापूर तालुका मिशन वात्सल्य समिती अध्यक्ष, सचिव, सर्व सन्माननीय सदस्य व महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती राज्य निमंत्रक  हेरंब कुलकर्णी यांच्या समन्वयातून तुळजापूर तालुक्यातील कोविड - 19 मुळे अनाथ झालेल्या मुलांचे, विधवा, एकल व निराधार लोकांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.

 
Top