कळंब / प्रतिनिधी- 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे दि. २८ ऑक्टोबंर  पासून काम बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा फटका बसस्थानकातील आस्थापना धारकांना मोठा बसला आहे त्यामुळे मासिक भाडे भरण्याची सुद्धा ऐकत आस्थापनाधार काकडे नसल्यामुळे परिवहन मंत्र्याकडे एक निवेदन देऊन एक महिन्याचे भाडे माफ करण्याची मागणी सर्व अस्थापना धारकांनी केली आहे.  

निवेदनात म्हटले आहे की , वाहक चालक व इतर कर्मचाऱ्यांनी दि. २८ ऑक्टोबर पासून आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या सणात आंदोलनाचे हत्यार उपसून बस वाहतूक बंद केली. दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने व कोरोणा निर्बंध हटल्यामुळे प्रवाशंची वाढती संख्या लक्षात घेऊन अस्थापना धारकांनी दिवाळी सणात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला होता परंतु महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐनवेळी दिवाळीच्या सणात संपाचे हत्यार उगारून सर्व बस वाहतूक बंद केली त्यामुळे बस स्थानकात सर्वत्र शुकशुकाट पसरला व दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यातच मासिक भाडे ची सक्तीची वसुली सुरू झाली. भाडे भरण्यासाठी दुकानदाराकडे पैसेही नाहीत त्यामुळे राप प्रशासनाने एक महिन्याचे मासिक भाडे माफ करावे अशी मागणी शंकर मेहता, दिलीप चालक, श्री. घिसरे, बब्रुवान शिंदे, विलास मुळीक, दत्तात्रय उमाप, करीम पठाण, सुरवसे ,भोसले, आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top