कळंब / प्रतिनिधी-

केंद्र शासनाच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल,गॅस व तीन काळे कृषी कायदे यामुळे सर्वसामान्याचे जिवन मुश्किल झाले आहे.यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत प्रदेश सचिव व उस्मानाबाद जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी व्यक्त केले.कळंब तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस च्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये जनजागरण सप्ताह निमित्त कळंब मध्ये जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमा मधून केंद्र सरकार यांनी केलेल्या पेट्रोल ,डिझेल, गॅस दर वाढ व तीन कृषी काळे कायद्यांच्या विरोधात जनजागृती करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू ह्या केंद्र सरकारच्याच चुकीच्या धोरणांमुळे कश्या महाग झाल्या आहेत.यासाठी सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्यात यावी याविषयी या कार्यक्रमातून सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कळंब  तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार यांनी केले.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील,जिल्हा संघटक राजभाऊ शेरखाने,विश्वनाथ कोलमकर,जिल्हा उपाध्यक्ष शंकर नाना करंजकर सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंदार माने, जिल्हा सचिव बाबुराव तवले,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत धस ,शहराध्यक्ष रवींद्र ओझा विधानसभा अध्यक्ष भैय्या निरफळ, शिंगोलीचे सरपंच दौलतराव माने यांनी उपस्थिती लोकांना मार्गदर्शन केले.यावेळी कळंब शहर अध्यक्ष सचिन गायकवाड,प्रदेश सरचिटणीस सेवादल अध्यक्ष संजय घोगरे,माजी तालुकाध्यक्ष दिलीप सिंह देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष  ज्योतीताई सपाटे, पाटील  महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अंजलीताई ढवळे ,शहर अध्यक्ष खराटे मॅडम जिल्हा उपाध्यक्ष भूषणसिंह देशमुख ,तालुका अध्यक्ष किसान सेल विलास करंजकर, युवा नेते विशाल शितोळे पाटील यंग ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रणित डीकले सेवादल तालुका  अध्यक्ष पोपट अंबिरकर अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शहाजनी शकीलगार, मागासवर्गीय शहराध्यक्ष बबन उर्फ विश्वास हौसालमल ,अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पवार ,शितल ताई खंडागळे, दादा खंडागळे, अशोक भातलवंडे, सुरेश बापू मस्के, राजेश पुरी, बाळासाहेब शेळके वैशाली धावारे यांच्यासह काँग्रेसच्या महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले तर आभार काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भातलवंडे यांनी मानले.

 
Top