कळंब / प्रतिनिधी -  उस्मानाबाद जिल्ह्यात सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी व जिल्ह्याची ओळख राहण्यासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँक विकास पॅनललाच मतदान करा असे आव्हान वसंतराव नागदे यांनी कळंब येथे आयोजित प्रचार सभेच्या बैठकीत केले. कळंब शहर व परिसरातील मतदारांसाठी उस्मानाबाद जनता सहकारी विकास पॅनलच्या प्रचारा साठी दि. १४ रोजी शहरातील साई मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी चे  अध्यक्ष म्हणून प्रियदर्शनी अर्बन को. ऑप. या  बँकेचे चेअरमन श्रीधर भवर हे होते .यावेळी व्यासपीठावर वसंतराव नागदे, विश्वास शिंदे ,वैजीनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, पांडुरंग धोंगडे, सुभाष गोविंदपूरकर, चंद्रकांत बागल, राजाभाऊ मुंडे ,पांडुरंग कुंभार, भागवत धस, हनुमंत मडके, प्रकाश मुंदडा, शहाजी पाटील, आप्पासाहेब शेळके आदी उपस्थित होते.  यावेळी वसंतराव नागदे म्हणाले की जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी हे सहकार क्षेत्र टिकले पाहिजे विरोधकांच्या भूल-थापांना बळी न पडता आपली बँक सहकार क्षेत्रात टिकली पाहिजे म्हणून आपल्या उस्मानाबाद जनता सहकारी विकास पॅनल ला खंबीरपणे साथ देऊन येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त सभासदांनी नागदे, मोदानी - शिंदे या पुरस्कृत उस्मानाबाद जनता सहकारी विकास पॅनल ला मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत नागदे मोदानी शिंदे पुरस्कृत उस्मानाबाद जनता सहकारी विकास पॅनल ला उमेदवार पांडुरंग यशवंत धोंगडे यांनी या वेळी जाहीर पाठिंबा दिला .

यावेळी कार्यक्रमाची  सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवतराव धस  यांनी केले तर आभार पांडुरंग कुंभार यांनी उपस्थितांचे मानले. या वेळी बैठकीसाठी शिराढोण, येरमाळा, मोहा ,कळंब परिसरातील सभासद मोठ्या संख्येने हजर होते.

 
Top