उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत केशेगाव, बामनी, ताकविकी, तोरंबा, गोगाव, भंडारी, ककासपूर, बरमगाव (खु), पाटोदा, करजखेडा इत्यादी ठिकाणी शिवसेना शाखेचे उद्घाटन व विविध विकास कामाच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी डॉक्टर पाटील कुटुंबावर हल्ला चढवला ज्यांनी 35 वर्षे सत्ता उपभोगली व जिल्हा दारिद्र्यात ठेवला व स्वतः देशातील श्रीमंत खासदाराचे यादी तीन नंबरला राहिलात याचे आधी उत्तर द्या?

  स्वतः पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी आपल्या जिल्ह्यातील जमिनी   प्रकल्पात घातल्या व इतर जिल्ह्याला जाण्याची सोय केली व पस्तीस वर्षे केवळ स्वतःचा विकास करून घेतला.

 पस्तीस वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या हक्काचे मेडिकल कॉलेज मुंबई नेरूळ ला नेले व आपला जिल्हा या मेडिकल कॉलेज पासून वंचित ठेवला पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक रुग्ण आरोग्य सुविधा मिळाल्या नाहीत म्हणून मृत्युमुखी पडले जर असे मेडिकल कॉलेज व पोषक वैद्यकीय सुविधा जिल्ह्यात उपलब्ध असत्या तर अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला नसता ही गरज लक्षात घेऊन मी व जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार अमित भैया देशमुख वैद्यकीय शिक्षण मंत्री, राजेश भैय्या टोपे, मुख्यमंत्री व शरद पवार साहेब यांना जिल्ह्याची सर्व परिस्थितीची जाणीव करून देऊन वैद्यकीय मेडिकल कॉलेज मंजूर करण्यासाठी सतत पाठपुरावा केला त्यामुळे सर्व शासकीय असे  मेडिकल कॉलेज शासनाने मंजूर केले व 21 tmc  पाण्याचा प्राधान्यक्रम देखील बदलून दिला स्वतः पाटबंधारे मंत्री असताना यांनी जिल्ह्याच्या बाबतीत कुठलाही विकासाचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे माझे जाहीर आवाहन आहे की तुम्ही 35 वर्षाचा लेखाजोखा मांडा मी केवळ अडीच वर्षे सत्तेतील खासदार आहे व या सत्तेचा अडीच वर्षांचा लेखाजोखा व केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा मानतो असे जाहीर आव्हान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, प्रवीण कोकाटे, नितीन शेरखाने, जावळे दादा, कोळगे एच.एम., देवकते, दीपक पाटील, मुकेश पाटील व अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top