उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नगर परिषद उस्मानाबादची महाराष्ट्र न.प.अधिनियम १९६५ कलम नुसार विशेष सभा बोलाविण्याची मागणी १४ नगरसेवकांनी केल्यानंतर नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यंानी १५ नोव्हेंबर रोजी विशेष सभा घेतली. या सभेत ज्या ठिकाणी अडचणी व समस्या निर्माण झाल्या आहेत. व भुमिगत बांधल्यानंतरच विकास कामे करावीत या शासन निर्णयाची अडचण येत नसेल तरच  त्या ठिकाणीच गटारीची कामे करण्यात येईल, असा निर्णय या विशेष सभेत घेण्यात आला. 

न.प.ची विशेष सभा नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली  दुपारी १ वाजता सुरू झाली. यावेळी मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे उपस्थित होते. सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेमध्ये भुमिगत गटार योजना राबवायची आहे. त्यानंतर रस्त्यांची कामे करायची आहेत. शासनाच्या निर्णयानुसार भुमीगत गटारे भुमीगत गटारी बांधल्यानंतरच रस्त्याची कामे करने आवश्यक आहे असा शासन निर्णय आहे.  त्यामुळे जिथे आडचणी व समस्या निर्माण झाल्या आहेत. व शासन निर्णयाची अडचण नसेल  त्या ठिकाणीच गटारींची कामे करण्यात येतील, असे ठरविण्यात आले. यावेळी नगरसेवक युवराज नळे, शिवाजी पंगुडवाले, गणेश खोचरे, सूरज साळुंके, अभिजीत काकडे, िसध्देश्वर कोळी, बाळासाहेब काकडे, सिध्दार्थ बनसोडे, खलिफा कुरेशी, सोमनाथ गुरव, प्रेमाताई पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. 

अण्णाभाऊ साठे पुतळ्यास एनओसी नाही

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा साठे चौकात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतू सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस विभागाने एनओसी दिली नसल्यामुळे परत दुध डेअरीच्या एक एकर जागेत बसविण्याचा निर्णय झाला आहे. या संदर्भातला प्रस्ताव ही एनओसीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. एनओसी मिळल्यानंतरच व प्रशासनाने सदर जागेचे हस्तांतरण नगर परिषदकडे केल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, अशी माहिती नगरध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

 
Top