उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तुळजापूर मंदिरात अल्पवयीन मुलामुलींच्या वाढत चाललेल्या भिक्षेसंदर्भात बंदी घालून  त्यांना बालअधिकार मिळवून द्यावेत या प्रमुख मागणीचे निवेदन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना भाजपा महिला मोर्चा धाराशिवच्या वतीने   देण्यात आले.

यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अर्चना रविंद्र अंबुरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य ॲड.पुजताई देडे, भाजपा युवती जिल्हाध्यक्ष पुर राठोड,  भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस लतिका पेठे,  ओ.बी.सी. सेल चे सारिका कांबळे उपस्थीत होते.


 
Top