तुळजापूर/ प्रतिनिधी-

 ‘संविधान दिन’ तुळजापूर पालिकेच्यावतीने साजरा करण्यात आला.  नगराध्यक्ष  सचिन रोचकरी यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तत्पूर्वी पालिकेच्या प्रांगणामध्ये सर्व कर्मचारी व शिक्षक वृंद यांचेकडून भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून घेण्यात आले. 

सदर प्रसंगी नगरसेवक पंडित देविचंद जगदाळे विजय कंदले, विनोद गंगणे,अविनाश गंगणे, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, कर निर्धारक रणजित कांबळे, स्वच्छता निरीक्षक दत्ता साळुंके व इतर कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.


 
Top