उस्मानाबाद / प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पूजन भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी संविधान प्रतिज्ञा वाचन केले. त्याचबरोबर ऍड खंडेराव चौरे यांनी संविधान दिनांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी 26/11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमास विजय शिंगाडे ,ऍड कुलदीपसिंह भोसले,अभय इंगळे,दाजीप्पा पवार,प्रवीण सिरसाठे, नरेन्द्र वाघमारे, अमोलराजे निंबाळकर,संदीप इंगळे, विनोद निंबाळकर, अमोल पेठे, सुरज शेरकर,प्रसाद मुंडे,सुनील पंगूडवले,अक्षय भालेराव तसेच शहर व ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.