उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथे आठ हायमस्ट लॅम्प उभारणी कामाचा शुभारंभ हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे. काजळा येथे गुरुवारी (दि.४) दिपावली सणाच्या मुहूर्तावर  हा सोहळा संपन्न होणार आहे. 

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची उपस्थिती राहणार आहे .उस्मानाबाद  तालुक्यातील काजळा येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या प्रयत्नातून राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून २५-१५ योजनेतून हायमस्ट लॅम्पच्या कामासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे आहे. या निधीमधून ८ हायमस्ट लॅम्पची उभारणी करण्यात येणार आहे. दिपावली सणाच्या मुहूर्तावर मंगळवारी  हभप नवनाथ महाराज यांच्या हस्ते हायमस्ट लॅम्पच्या  कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी या कामाचे शिल्पकार तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास काजळा व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच प्रविण पाटील, उपसरपंच नाना मडके, श्री रामानंद महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रदीप बप्पा  शेळके, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.


 
Top