तुळजापूर / प्रतिनिधी :-  

 तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत  तुळजापूर  आगारातील मेकँनिक पदावर असणाऱ्या नागनाथ झाडपिडे यांनी आपल्या मुलाच्या  रविवार संपन्न झालेल्या  लग्नाच्या  डेकोरेशनची थीम एसटी ठेवुन  एसटी कर्मचाऱ्यांचा संपाकडे प्रवासी व एसटी महामंडळाचे प्रशासनाचे लक्ष वेधले.

 या लग्न सोहळ्यात मंगल कार्यालयाचा  प्रवेशव्दार असलेल्या  दर्शनी भागावर एस टी चिञ लावले होते व त्यावर “एसटी माझी माय माऊली” असे लिहले होते.  एसटी लग्न कार्य सोहळ्यात सर्वसामान्य साठी कशी आवश्यक आहे हे डिझीटलवर चिञ काढुन दर्शवले होते.

या लग्न सोहळ्याचे आणखी ऐक ऐक वैशिष्ट्ये म्हणजे यात  एसटी संप व मागण्यांना लग्नात स्थान  होते लालपरी जीवनवाहिनी  मंगलाष्टके , उखाणाही एसटीचा विलीनीकरण लढ्याला  पाठिंबा देणारे म्हटले गेले.   लग्न मंडपात फ्लेक्स व बॅनर लावण्यात आले यामध्ये आंदोलन दरम्यान शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले होते  तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी “ खचून नका जाऊ लेकरांनो करू नका आत्महत्या  माझीच होत आहे हत्या ! असे भावनिक आवाहन करणारे संदेश यावर लिहले गेले होते.

  सर्वांना इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या इछा  कधी पूर्ण होणार ? एसटी तर्फे प्रवाशाना दिल्या जातात अनेक  सुविधा परंतु एसटी कर्मचाऱ्यांसाठी काय ? असा सवाल शासनाला बॅनरच्या माध्यमातून विचारला होता. 

 एसटी महामंडळ बरखास्त करून कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत  घ्या अशी शासनाला विनंती करणारे  बॅनर लावली  होती. या   लग्नात मंगलाष्टका मधुन  एसटीचे महत्व व व्यथा सांगितली गेली .

नवरदेवाने आणि नववधू उखानेही एसटीचेच घेतले. नवरदेव शुभमने उखाणे घेताना “ एसटी आहे महाराष्ट्रची ला परी नम्रता आहे माझी सोनपरी “ तर नवरी नम्रताने उखाणे घेताना “ एसटी महामंडळ आहे महाराष्ट्रची शान , शुभमराव आहेत माजी  जान “: असा अर्थपूर्ण संदेश देत संपकरी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण आवाहन केले आहे.हा आगळा वेगळा सोहळा अनेकांचा स्मरणात राहणारा ठरला  या लग्न सोहळ्याची चर्चा परिसरात चविष्टतेने चर्चिली जात आहे.


 
Top