परंडा / प्रतिनिधी :-  

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालयांमध्ये आई क्यू ए सी च्या वतीने एक दिवसीय डिजिटल एज्युकेशन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या तर व्यासपीठावर आय क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने आणि स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे उपस्थित होते . या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने covid-19 चे पालन करत मास्क व सॅनिटायझर वापरून उपस्थित होते. डिजिटल एज्युकेशन आयटी सोलुशन लिमिटेडच्या श्रीमती सृष्टी या  कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑनलाइन उपस्थित होत्या. त्यांनी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध माहितीचे संकलन कसे करावे, त्यांची माहिती कशी भरावी यासंदर्भात कार्यालयांमध्ये ई आर पी, एल एम एस, एम आय एस या सिस्टीम बद्दल सविस्तर माहिती सांगितली. 

यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या ऑनलाइन विचारून त्याचे निरसन करून घेतले। महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख  यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तांत्रिक सहकार्य केले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दीवाने, विवेक इंगळे व बाबासाहेब क्षीरसागर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले .प्रास्ताविक डॉ महेशकुमार माने यांनी केले .शेवटी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ दिपा सावळे म्हणाल्या की ऑनलाइन कार्यशाळेमुळे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज करत असताना येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये करून घ्यावा कारण सध्या सर्व माहिती ही डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध असल्यामुळे त्याविषयी माहिती घेऊन त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ शहाजी चंदनशिवे यांनी मानले.

 
Top