तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बायफ बिआयएसएलडी संस्थेमार्फत विविध योजना उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यासाठी चालू आहेत. यापैकी विनायकदादा पाटील नवजीवन प्रकल्पा मार्फत आत्महात्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील विधवा महिलांना चिरस्थायी उपजीविका संसाधने निर्माण करण्यासाठी मदत करीत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ११ आत्महात्याग्रस्त कुटुंबासाठी मदत करण्यात आली आहे.

 सदर साहाय्याचा उपयोग करून या कुटुंबाचा उपजीविकेला मदत होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बद्दल होईल अशी अपेक्षा आहे. शेतीतील उत्पादन आणि बाजारात मिळणारा भाव याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे , आर्थिक गणित जुळत नसल्याने अनेक तरुण शेतकरी मृत्युला कवटाळत आहेत शेतकरी कुटूंबातील कर्त्या व्यक्तीने जर आत्महात्या केली तर त्यां कुटुंबाचे काय हाल होत असतील याची कल्पना ही करवत नाही . या शेतकऱ्याच्या छायेखाली असणारे आख्ये कुटूंब उघड्या वर येते , त्यांच्या रोजी रोटीचे साधन काय , कुटूंबाचे भविष्य काय ? या गोष्टी अनेकदा राहतात हेच लक्षात घेऊन बायफ संस्थेच्या वतीने “ नवजीवन प्रकल्प “ हा एक अभिनव उपक्रम राबवला  जात आहे.या कार्यक्रमातून १ ) फळबाग लागवड २) कृषी साहय्य ३ ) शेळी व गाय व्यवस्थापन ४ ) ग्रामीण बिगरशेती व्यवसाय ५) कौशल्याधारीत व्यवसाय 

अशा योजना ह्या प्रकल्पामार्फत दिल्या जात आहे. बायफ बिआयएसएलडी संस्थेमार्फत शेतकऱ्याच्या दारात जाऊन गायी व  म्हैस मध्ये कृत्रिम रेतन ही योजना एचडीएफसी बॉक मार्फत चालवली जाते, या मध्ये ९०% कालवडीची हमी असणारे सिनेम वापरून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी बायफ संस्था काम करत आहे. आशा विविध योजना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राबवित आहेत . ह्या योजनेचे लाभ घेण्यासाठी बायफ संस्थेचे क्षैत्रिय प्रकल्प अधिकारी  आतूल मुळे यांनी पशुपालकांना अहवान केले आहे.


 
Top