उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथे सोमवारी (दि.29) आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन मेळाव्यासाठी उस्मानाबाद जिल्हा एकल शिक्षक सेवा मंच तर्फे सक्रिय पाठिंबा व सहभाग आहे.

जिल्ह्यातील एकल शिक्षक सेवा मंचचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सोमवारी होणार्‍या पेन्शन मेळाव्यासाठी उपस्थित राहून या लढ्यात सामील व्हावे असे आवाहन राज्य कोषाध्यक्ष पवन मारुतीराव सुर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष शिवाजी खांडेकर पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शांता सलगर, राज्य मार्गदर्शक अजय कमातकर, जिल्हा सरचिटणीस दिपक हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष खुदबुद्दीन शेख, जिल्हा कोषाध्यक्ष गणेश राऊत, मार्गदर्शक राजेंद्र चव्हाण, नितीन सलगरे, सुधीर घुगे, तसेच तानाजी पाटील, सुदाम सुतार, नितीन घूटे, राहुल थोडसरे, दत्ता पडवळ व एकल मंचचे सर्व पदाधिकारी यांचे तर्फे करण्यात आले आहे.

 
Top