मॅन काइंड कंपनीचा उपक्रम, आतापर्यत 150 कोटीची मदत

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोणा काळात सेवा देत असताना निधन झालेल्या केमिस्ट बांधवांच्या कुटुंबियांना मॅन काइंड फार्मा कंपनी तर्फे तीन लाख रुपयांची मदत देण्यात आली. शहरातील औषधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

         कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना केमिस्ट ग्राहकांना औषध पुरवठा सुरू ठेवत सेवा देत होते. या महामारीत समोर येणारा रुग्ण कोणत्या आजाराचा आहे. याची खात्री नसताना स्वतःची पर्वा न करता केमिस्ट्ने गेली दीड वर्षे अखंड औषध पुरवठा केला आहे. ही सेवा देत असताना काही केमिस्ट ना कोरोनाची लागण होऊन आपले प्राण गमवावा लागला. याची दखल घेऊन मॅनकाईन्ड कंपनीने भारतात कोरोना काळात विविध क्षेत्रात सेवा देत असताना मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुमारे 150 कोटी रुपये आजपर्यंत मदत म्हणून दिले आहेत. कोरोनाने निधन झालेले बेंबळी येथील प्रथमेश मेडीकलचे सुधाकर आगाशे यांच्या कुटुंबियांना यावेळी मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी मॅन काइंड फार्माचे रिजनल मॅनेजर प्रदीप कदम त्यांचे सहकारी पुरूषोत्तम येवले शाम गुरव, अविनाश साबळे, सुजित सगरे, ओमकार चव्हाण, किशोर सुर्वे व योगेश भरड उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उस्मानाबाद जिल्हा संघटनेचे अध्यक्ष धनाजी आनंदे, कोषाध्यक्ष कुणाल गांधी, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष रोहित फिसरेकर, मार्गदर्शक दिनेश वाबळे, लक्ष्मण मुंडे, राहुल जाधव, सर्फराज पटेल, पोपट शिंदे, विशाल हिंगमिरे व केमिस्ट बांधव उपस्थित होते. केमिस्ट बांधवांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

 
Top