उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन बुधवार दि.२४ नोव्हेंबर २०२१ रोजी, मौजे काटगाव ता.तुळजापुर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात काटगाव व परिसरातील सर्व वयोगटातील ४०० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे छाया साखरे ग्रा.प.सदस्य, सौ.गंगणेताई रेणुका, बाबा बेटकर, खंडु पावले, गुणवंत कोनाळे (माजी सरपंच), विनोद माळी, उपसरपंच अशोक माळी, संगमेश्वर साखरे, धोंडीबा जोकार, सौ.भाग्यश्री हकारे, तुकाराम माळी, अण्णासाहेब गिराम, बळीराम चेंडके, ग्रामसेवक झाडेसाहेब, इरफान शेख, हाशांत मुळे, भिमराव गायकवाड, काटगाव P.H.C. चे डॉ.जळकोटे व डॉ.दासारवाड, आशा कार्यकत्या, कर्मचारी शिक्षक व शिक्षीका नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.ऋषीकेश आगरकर, डॉ.पंडीत गणवीर, डॉ. अन्सु कुमार, डॉ.धवल रंका, डॉ. लायर रोशन, डॉ.परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवेच केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, रवी शिंदे, संदिप चव्हाण, वैभव रेडे ईत्यादींनी परीश्रम घेतले.


 
Top