उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी व त्याच्या न्याय मागण्या मान्य कराव्या यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवार दि. १० नोव्हंेबर रोजी  उस्मानाबाद आगार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा  काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

 या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सदस्य भैय्यासाहेब नागटिळे , जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे , महिला अध्यक्ष जीनत प्रधान , युवक जिल्हाध्यक्ष दिलीप आडे , महासचिव बाबासाहेब जानराव , उपाध्यक्ष रोहिदास लोहकरे , युवक उपाध्यक्ष वैभव गायकवाड , भूम तालुका अध्यक्ष मुसाभाई शेख , प्रवक्ता प्रा शहाजी चंदनशिवे , धनंजय सोनटक्के , तानाजी बनसोडे , जिल्हा उपाध्यक्ष सुशील बनसोडे , महिला जिल्हा संघटक अनुराधा लोखंडे , सहसंघटक आर एस गायकवाड , शितल चव्हाण , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे , जयपाल सुकाळे , जिल्हा उपाध्यक्ष ऍड लक्ष्मण खुणे , रोहिदास फक्राबादकर , सचिन माने यांच्यासह एसटीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी , वंचितचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 
Top