उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बजाज अलाईन्स कडून पीक विमा देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली जात असल्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. बुधवार दि. १० नोव्हेंबर रोजी जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

जनहितच्या पदाधिकाऱ्यांनी कांही दिवसापुर्वीच बजाज अलाईन्सच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी परिसरात आले. संघठनेच्या एका पदाधिकाऱ्याने बुरखा घालून जिल्हाधिकारी परिसरात प्रवेश केला. त्यानंतर बजाज अलाईन्सच्या विरोधात घोषणाबाजी करीत अंगावर डिझेल टाकत आत्महदन करण्याचा प्रयत्न जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी केला. यावेळी पोलिस व आंदोलनकर्ते यांच्यात झटापट झाल्याची पहावयास मिळाली. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. 


 
Top