उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या पंचवार्षीक संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या फेरी अखेर नागदे-मोदाणी-शिंदे पॅनल विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. विरोधकांच्या पॅनलला शेकड्यावर मते मिळाली तर नागदे-मोदाणी पॅनलच्या उमेदवारांना पहिल्या फेरी अखेर ७ हजार ८००  मताचे मताधिक्य मिळाले. एकुण मतमोजणीच्या तीन फेऱ्या होणार आहेत. 

गेल्या २० वर्षांत यंदा प्रथमच सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक उस्मानाबाद जनता सहकारी बहुराज्यीय बँकेची पंचर्षीक संचालक मंडळाची निवडणुक लागली होती. यासाठी गेल्या ८ ते १० दिवसापासून सत्ताधारी विरोधकात आरोपांच्या फैरी ही झडल्या होत्या. १९ नोव्हेंबर रोजी १४ संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. ६७८४२ मतदारापैकी ३२५७६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकुणन ४८.०२ टक्के मतदान झाले होते. २० नोव्हेंबर रोजी सकाळपासून उस्मानाबाद शहरातील छायादिपमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. १४ मतपत्रिका व शिक्क्यांनी केलेले मतदान त्यामुळे एकुण ५० टेबलावर मतपत्रिकांचे वेगवेगळे गठ्ठे बांधण्यात आले. त्यामुळे मतमोजणीला विलंब लागला.  दुपारी अडीच पर्यंत पहिली फेरी संपन्न झाली. पहिल्या फेरी अखेर नागदे-मोदाणी-शिंदे पॅनलच्या उमेदवारांना ७ हजार ८००  मते मिळाली तर सुधीर पाटील याच्या पॅनलच्या उमेदवारांना १ हजार ते १२०० जवळपास मते मिळाली. मतमोजणीच्या एकुण तीन फेऱ्या होणार आहेत. निकाल रात्री ९ पर्यंत लागेल, असे डी.डी.आर सुनील शिरपूरकर यांनी सांगितले. 


 
Top