तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील, अरण्यगोवर्धन मठाचे मठाधिपती महंत व्यंकट आरण्य गुरू शिव आरण्य हेच मठाधिपती आहेत व पुढेही राहती,असे जाहीर करुन  तसेच त्यांचा धार्मिक विधी येत्या मार्गशीष महिन्यात येऊन आम्ही तो दोन दिवस पारंपारिक परंपरेने विधी पार पाडू, असे प्रतिपादन  जगदगुरू शंकराचार्य  संस्थान मठ संकेश्वर करवीर पीठाचे श्री प.पू. सच्चिदानंद अभिनव विद्या येथील, अरण्यगोवर्धन मठाचे मठाधिपती महंत व्यंकट आरण्य गुरू शिव आरण्य हेच मठाधिपती आहेत व पुढेही राहतील,असे जाहीर करुन  तसेच त्यांचा धार्मिक विधी येत्या मार्गशीष महिन्यात येऊन आम्ही तो दोन दिवस पारंपारिक परंपरेने विधी पार पाडू, असे प्रतिपादन  जगदगुरू शंकराचार्य  संस्थान मठ संकेश्वर करवीर पीठाचे श्री प.पू. सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामि यांनी  श्रीक्षेत्र तुळजापूर येथे शनिवार दि.२० रोजी सिद्ध गरीबनाथ मठात  पञकार परिषद घेवुन केले.

यावेळी बोलताना श्री जगद्गुरु शंकराचार्य  म्हणाले की, अरण्य गोवर्धन मठ तुळजापूर यांच्या मठाधिपतीची नियुक्ती तिर्थक्षेञ तुळजापूर येथील मंहत संताच्या प्रमुख उपस्थितीत कुलदीप नानासाहेब अमृतराव यांची महंत व्यंकट आरण्य गुरु शिव आरण्य असे नामकरण करून अरण्य गोवर्धन मठाधिपती म्हणून श्री क्षेत्र तुळजापूर येथील सर्व महंतांनी मिळून केली होती .परंतु तुळजापूर येथील  काही मंडळींनी जगद्गुरु शंकराचार्य यांच्या करवीर पीठ येथे येऊन आमची भेट घेतली व मठाच्या गादीवर मठाधिपती नाहीत,असे सांगून आमच्याकडून अरण्य गोवर्धन मठाच्या पीटीआर मध्ये मठाचे महंत नियुक्त करण्याचे अधिकार शंकराचाऱ्यांना आहेत,असे सांगून त्यांची दिशाभूल करून चेतन शेखर खोले यांच्या नावाने निवडीचे पत्र आणले व त्याविषयी सर्वञ प्रसिद्धी केली  परंतु मठाच्या गादीवर असलेले महंत व्यंकट आरण्य महाराज यांना हे  समजताच त्यांनी संकेश्वर-करविर येथे येऊन भेट घेऊन संपूर्ण विषय समजावून सांगितला. सर्व परिस्थिती पाहता असे लक्षात आले की काही मंडळींनी  आम्हाला खरी परिस्थिती अंधारात ठेवून दिशाभूल केली आहे. त्यावर आम्ही सर्व कागदपत्रे पाहून विचार करून दिनांक २१/०७/२०२१ रोजी आज्ञापत्र दिले . 

 या प्रसंगी महंत मावजिनाथ गुरुतुकनाथ बुवा, सिद्ध गरीब नाथमठ तुळजापूर, महंत इच्छा गिरी  गुरु महादेव गिरी सोमवार गिरि मठ तुळजापूर, श्री नागेश  शास्त्री अंबुलगे, श्री.संजय  सोनवणे, श्री शिवप्रतिष्ठानचे दिनेश धनके, विजयकुमार घोडके, गोरक्षा समिती तुळजापूर तालुक्याचे सर्वश्री अनिल पवार, महेश गायकवाड, मेघराज बागल, मंगेश कोळी, किरण शिंदे इ यावेळी  उपस्थित होते.  


 
Top