परंडा / प्रतिनिधी

 तालुक्यातील शेळगाव येथील सनराईज स्कूल मध्ये  आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रथम शाळेचे पालक प्रतिनिधी अण्णा तांबे व मुख्याध्यापक संभाजी देवकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरुवात दि.४ऑक्टोबर सोमवार पासूनऑफ लाईन पद्धतीने ग्रामीण भागातील  पाचवी ते बारावी वर्ग कोरोनाचे सर्व नियम पाळून  सुरू होत आहेत.त्या अनुषंगाने पालक मेळावा (मिटींग)आयोजीत करण्यात आला होता.१००%पालकांनी नियमितपणे शाळा सुरू करण्यास सहमती दर्शवली  यावेळी विविध विषयावर शिक्षक -पालक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी सहशिक्षक प्रकाश शिंदे, राहूल शिंदे पालक लहू भोगील , तानाजी साळुंके,अण्णा तांबे, बापूराव पाटुळे,सुभाष कासारे,बापूराव जरांडे, संजय मोरे,डॉ उदागे,सोमनाथ खरसडे आदी उपस्थितीत होते.

 
Top