उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अवैधरित्या धाबे व छोटे मोठे हॉटेल व्यवसाय यांची संख्या वाढत असून कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता हे व्यवसाय राजरोसपणे चालू आहेत व त्या ठिकाणी अवैध दारू विक्री व दारू प्राशन करण्यास परवानगी दिली जात असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील दोन वाईन शॉप येथून ठोक होलसेल दारू विक्री करून धाब्यावर पार्सल केली जात आहे त्यांची चौकशी करण्यात यावी तसेच पोलीस विभाग या अवैध व्यवसायकावर नाममात्र कारवाई करतात जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात बनावट दारू विक्री होते असुन महिन्याकाठी कोट्यावधी रुपयांचा अवैध व्यवसाय राजरोसपणे चालू आहे तेर येथे अशाच अवैध दारू विक्री त्याला पकडले असता त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयाचा बनावट साठा जप्त केला आहे असेच रॅकेट जिल्ह्यात कार्यरत आहेत  

उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील धाब्यावर अवैध दारू विक्री करणाऱ्या मालकावर व जागा मालकावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी  मागणी उस्मानाबाद जिल्हा परमिट रूम असोसिएशनकडून करण्यात आली आहे

  अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यावर हा मोठा अन्याय होत असून अधिकृतपणे परवाना घेऊन व नियमितपणे शासनाचा महसूल देऊन व्यवसाय करतात आणि अनधिकृत धाबे व हॉटेलची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने अधिकृत व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे तरी अशा प्रकारच्या अनधिकृत व्यवसायास प्रतिबंध करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे

  या निवेदनावर परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष संपतराव डोके उपाध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी सचिव राजेंद्र आवटे यांच्या सह्या आहेत.


 
Top