तुळजापूर  / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विन पौर्णिमा सोहळा बुधवार दि.२० रोजी पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी होवुन संपन्न झाला. मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांत हजारो भाविकांनी तुळजापुरात येऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. बुधवारी ( दि .20 )  रोजी राञी  सोलापूरच्या  मानाच्या काठ्यांसह अश्विनी पौर्णिमेचा मानाचा छबिना आई राजा उदो उदो च्या गजरात  काढण्यात आला.

   मंगळवारी कोजागिरी व बुधवारी  अश्विन पौर्णिमानिमित्ताने भाविकांनी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन  तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले .कोरोना पार्श्वभूमीवर अश्विनी पोर्णिमा कालावाधीत जिल्हाबंदी जाहीर केली  व भाविकांना मंदीरात सोडणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली होती.

  तरीही प्रशासनाने भाविकांना मंदीरात सोडुन देवीदर्शन घडवले.  भाविकांनी आनंद व्यक्त केला .  कोजागिरी मंगळवारी व अश्विनी पोर्णिमा बुधवारी होती. या दोन्ही दिवशी भाविकांनी देवीदर्शन लाभ मिळाला . पौर्णिमेनिमित्त बुधवारी पहाटे  श्री तुळजाभावानी देवीची मूर्ती सिंहासनावर विराजमान करण्यात आली . त्यानंतर देवीमुर्तीस अभिषेक करण्यात आला.

 सायंकाळी सात वाजता पुनश्च देवीमुर्तीस अभिषेक करण्यात आल्यानंतर वस्ञोलंकार घालण्यात आले.  नंतर सोलापूरच्या शिवलाड समाजाच्या मानाच्या काठ्यासह पारंपारिक वाद्य गजरात  छबिना काढण्यात आला .

  मंदीरात फुलांची  सजावट 

  अश्विनी पोर्णिमा दिनी बुधवार दि.२०रोजी पुणे येथील देविभक्त आर.आर किराड यांनी  श्री तुळजाभवानी मंदीरात आकर्षक फुलांची  सजावट केली होती. या  फुलांचा आकर्षक सजावटीसाठी देशीविदेशी फुलांचा वापर करण्यात आला होता. श्रीतुळजाभवानी मातेवर असणाऱ्या श्रध्देपोटी आपण ही फुलांची सेवा केल्याची माहीती आर.आर किराड या देविभक्तांने दिली.




 

 
Top