उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथील विद्यार्थ्यांची बसअभावी मोठी गैरसोय सुरू असून उस्मानाबाद-सारोळा ही स्पेशल बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी आगारप्रमुख पी. एम.  पाटील व स्थानकप्रमुख रामचंद्र शिंदे यांच्याकडे केली आहे.  

सारोळा येथील विद्यार्थिनींसह विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने दररोज उस्मानाबाद शहरात येतात. सकाळी ६ ते ७ या वेळेत शाळा, महाविद्यालयासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र सारोळा येथून जाणाऱ्या उस्मानाबाद-औसा, कोंड या बसमध्ये प्रवाशी संख्या अधिक असते.  बसमध्ये जागा नसल्याने त्या बसस्टॉपवर थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात बसअभावी लेट पोहचावे लागत आहे. तसेच अनेक विद्यार्थी खासगी वाहनाने येतात. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी सारोळापर्यंत दररोज सकाळी ६.१५ वाजता व सकाळी १०.३० वाजता विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बस सोडण्यात यावी, अशी मागणी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी आगारप्रमुख श्री. पाटील व स्थानकप्रमुख श्री. शिंदे यांच्याकडे केली आहे.


 
Top