परंडा / प्रतिनिधी : -

परंडा तालुक्यातील टाकळी येथील वडार समाजातील अल्पवयीन मुलीवरील झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्यावतीने तहसील कार्यालय तहसीलदार परंडा व पोलीस ठाणे परंडा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले.

 परंडा तालुक्यातीत टाकळी येथील वडार समाजातील एका अत्यंत गरीब कुटुंबातील अल्पवयीन ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्याच्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राच्या तोंडाला काळिमा फासणारी घटना घडली आहे.या घटनेच्या निषेधार्थ म्हणून मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.

ही घटना झाल्याचे समजताच परंडा येथील पोलीस पथकाने संबंधित नराधमास अटक केली आहे.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर आरोपी ची सखोल चौकशी करून त्यास कठोर शिक्षेची कार्यवाही करण्यात यावी व बाल लैंगिक शोषण कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे तसेच संबंधित नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या घटनेचा निष्पक्षपणे तपास करून पिडीत कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा, या घटनेमागे आणखी कोणाचा प्रत्यक्ष व प्रत्यक्ष सहभाग आहे का याची चौकशी करण्यात यावी, सदर घटनेचे गांभीर्य पाहता आरोपीच्या कुटुंबीयांकडून पिडीत कुटुंबियांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून पोलीस संरक्षण देण्यात यावे व या घटनेचा पंचनामा करताना पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निवेदन देताना मी वडार महाराष्ट्राचा संघटना जिल्हाध्यक्ष अविनाश सुभाष ईटकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार, ता.अध्यक्ष भास्कर ईटकर, जनशक्ती संघटना मराठवाडा युवा अध्यक्ष राम ईटकर, परमेश्वर पवार, ब्रह्मदेव मांजरे, अमर भोसले, अविनाश भोसले, अजय ईटकर, संभाजी पवार, शिवराम पवार, बिभिषन पवार, रामा पवार, अनिल जाधव, यशवंत काळे, दिगंबर पवार, नवनाथ पवार, दिलीप पवार, मच्छिंद्र पवार, चंद्रकांत पवार आदींसह वडार समाजातील समाज बंधू उपस्थित होते.


 
Top