परंडा / प्रतिनिधी 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. एस के गायकवाड हे दिनांक ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे या उपस्थित होत्या तर व्यासपीठावर आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ.माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.संजीवन गायकवाड आणि दत्तात्रेय मांगले उपस्थित होते. 

सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजी धनवे , बि डी माने, उत्तम कोकाटे,  दीपक हुके, दत्तात्रेय मुळीक,  दत्तात्रेय मांगले, डॉ अरुण खर्डे ,यांनी आपली मनोगते व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी धनवे यांनी केले. 

 यावेळी सत्काराला उत्तर देताना संजीवन गायकवाड म्हणाले की मी आयुष्यामध्ये तीन गोष्टीला प्राधान्य दिले आहे त्यामध्ये कमवा आणि जगा, आपल्या कामातला प्रामाणिकपणा आणि सिस्त या गोष्टीला जर प्राधान्य दिले तर कोणताही व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. प्रामाणिकपणे काम केल्यास आणि काम करत राहिल्यास कार्यक्षमता वाढते. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ दिपा सावळे म्हणाल्या की पर्यवेक्षक संजीवन गायकवाड यांनी एकतीस वर्ष महाविद्यालयांमध्ये अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली आहे. विद्यार्थ्यांचे हित जपत कडक प्रशासन करून पाहिजे त्यांना मदत केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची जिम्मेदारी त्यांनी घेतली होती. यावेळी सेवानिवृत्त होत असताना त्यांनी दहा हजार रुपयांचा चेक महाविद्यालयास भेट दिले. 

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख यांनी सहकार्य केले.यावेळी माजी विद्यार्थी डॉ.निलोफर चौधरी आणि शिराळा हायस्कूल येथील गुंजाळ यांनी संजीवन गायकवाड यांचा बुके शाल देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे आभार डॉ. सचिन चव्हाण यांनी मानले.


 
Top