तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवास  गुरुवार ७ आँक्टोबर रोजी  घटस्थापना होऊन आरंभ होणार आहे. यंदाचा शारदीय नवराञ उत्सव कोरोना सावटाखाली पार पडणार असुन या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरात सर्वञ कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 श्री तुळजाभवानी मातेची  मंचकी निद्रस्त मुर्तीची  गुरुवारी पहाटे  सिंहासनावर  प्रतिष्ठापना केली जाणार आहे.  दुपारी १२ वा. विधीवत घटस्थापना करण्यात येणार आहे.  त्यानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवास सुरुवात  होणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या पुर्व संध्येला देवी दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  विशेषता कर्नाटक राज्यातील व भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेणा-यांची  गर्दी झाली होती. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंहत तुकोजीबुवा व वाकोजीबुवा यांनी गाभाऱ्यासह मंदीर परिसर स्वच्छ केला.  

 असे  होणार धार्मिक कार्यक्रम 

 आश्विन शुध्द 1शके 1943 गुरुवार दि  07ऑक्टोबरच्य पहाटे देविजींची  सिहासनावर प्रतिष्ठापना , दुपारी 12.00 वा.घटस्थापना ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे.राञी छबिना.,

शुक्रवार दि 8  नित्योपचार पूजा व राञी छबिना .,

शनिवार दि .9  श्रीदेविजींची नित्योपचार पूजा , रथ अलंकार महापुजा व राञी छबीना.,

रविवार दि.10 ललिता पंचमी देवीजींची  नित्योपचार पुजा  व मुरली अलंकार महापुजा राञी छबीना.,

सोमवार दि.11 देविजींची  नित्योपचार पुजा , शेषशाही अलंकार महापुजा व राञी छबीना.,

मंगलवार दि.12 श्रीदेवीजींची  नित्योपचार पूजा , भवानी तलवार अलंकार  महापुजा व राबी छबीना.,

 बुधवार दि.13 दुर्गाष्टमी श्रीदेवींजीची नित्योपचार पुजा , महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा , दुपारी 3-00 वा. वैदिक होम व हवनास आरंभ रात्री  08-10 मि . वाजता पुर्णाहुती , राञी छबीना.,

 गुरुवार दि.14 महानवमी श्री देवीजींची नित्योपचार पुजा , दुपारी 12.00 वा. होमावर धार्मिक विधी “, घटोत्थापन” व राञी  नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक.,

शुक्रवार दि. 15 विजयादशमी ( दसरा ) , उष काली देवीजींचे  शिबीकारोहन सिमोल्लघंन  मंदिराभोवती मिरवणूक , मंचकी निद्रा , शमीपुजन व सार्वत्रिक सिमोल्लंघन .

मंगलवार दि. 19 ‘ कोजागिरी पौणिमा रात्री म्हणजे दिनाक 20 ऑक्टोबर रोजी  पहाटे श्रीदेविजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना.,

बुधवार दि. 20 मंदिर पोर्णिमा  श्रीदेवीजींची  नित्योपचार पुजा, राञी  सोलापूरच्या काठयासह छबीना व जोगवा.,

गुरुवार दि. 21 श्रीदेवीजींची  नित्योपचार पुजा , अन्नदान महाप्रसाद व राञी सोलापूरच्या काठ्यासह छबिना.,

 श्रीतुळजाभवानी मुर्ती सिंहासनावर  सुरक्षित प्रतिष्ठापीत करण्यासाठी  मुर्तीचा खालील बाजुस लावण्यात येणारे मेन .महंत तुकोजी बुवा ,महंत वाकोजी बुवा,युवराज साठे,गोविंद गारडे,जयराज रणदिवे ,किरण लोंढे यांनी बुधवारी तयार केले. 

 
Top