उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उस्मानाबाद शहरातील रामनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र २ यांचे संयुक्त विद्यमाने “युवा स्वास्थ्य मिशन अंतर्गत  दि.२९आॅक्टोंबर रोजी सकाळी १०ते सायं ५वाजेपर्यंत कोविड लसीकरण संपन्न झाले.लसिकरणाचे उदघाटन  प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.यावेळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.अनुराधा लोखंडे,डाॅ.रेश्मा जाधवर (वैद्यकीय अधिकारी),प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.माधव उगीले,प्रा.बालाजी नगरे,प्रा.स्वाती बैनवाड, प्रा.राजा जगताप आदी उपस्थित होते.

या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी—विद्यार्थिनींनी यांचे बरोबरच  उस्मानाबाद शहारातील विविध भागातील नागरीकांनी आणि लाॅ.काॅलेज,बी.एड,डी.एड,य.च.म.मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी  लसीकरण करून घेतले.हे लसीकरण यशस्वी करण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र २चे श्रीमती झोंबाडे,श्रीमती वडतिले यांनी व आशा कार्यकर्ती श्रीमती सौदागर,श्रीमती अत्तार,श्रीमती सलीम शेख,श्रीमती सीरसीकर,आणि श्री.आडसूळ यु.एच.श्री.लोखंडे टी.एल.यांनी मेहन घेतली.


 
Top