तुळजापूर/ प्रतिनिधी-

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग,सांस्कृतिक विभाग , नॅक विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय ,तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-19 लसिकरण शिबिर संपन्न झाले.या वेळी शिबिराचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास दादा बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी प्र.प्राचार्य डॉ. अनिल शित्रे,उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव ,सिनेट सदस्य  डॉ. गोविंद काळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी  डॉ. शशिकला भालकरे , डॉ. वाघमारे बृहस्पती,नॅक समन्वयक  डॉ.प्रविण भाले यांची उपस्थिती होती.या लसिकरणा साठी उपजिल्हा रुग्णालय येथिल स्टाफ लस देण्यासाठी श्री. जयप्रकाश हिरेपट,  आफ्रिन कोतवाल,  शितल अभंग, धोत्रे मधुकर, लक्ष्मण पाटील, वैशाली जेटीथोर यांची उपस्थिती होती.

प्रारंभी या शिबिराचे प्रास्ताविक प्र.प्राचार्य डॉ. अनिल शित्रे यांनी केले.बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास दादा बोरगावकर साहेब यांचे स्वागत प्र.प्राचार्य प्रो. डॉ  अनिल शित्रे यांनी केले.शिबिरा करिता आलेल्या सर्व स्टाफ चे स्वागत  उल्हास दादा बोरगावकर साहेब यांच्या हस्ते केले. या वेळी शिबिरा करिता महाविद्यालयातील डॉ. सतीश कदम, डॉ.अंबादास बिराजदार,  प्रो.डॉ. अशोक कदम, प्रा.सौ.सुमित्रा कोरेकर मॅडम, प्रो. डॉ.अशोक मरडे , प्रो.डॉ.शेषेराव जावळे, डॉ.एन. एस. कदम तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,विध्यार्थी-विध्यार्थीनींनी उपस्थित होते.या शिबिराच्या यशस्वीते साठी प्रा. स्नेहा ठाकूर मॅडम, प्रा. अमोद जोशी,कृष्णा कोळी ,राजकुमार बनसोडे ,  जनार्धन पाटील ,आशपाक यांनी सहकार्य केले

 
Top