उमरगा / प्रतिनिधी-

रुग्णाची आणि शासनाची  फसवणूक करणाऱ्या उमरगा येथील डॉ. आर. डी. शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी (दि. २७) उमरगा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या पत्रानुसार वैद्यकीय अधिक्षक डॉ. आशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. आर. डी शेंडगे व तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बब्रुवान बनसोडे यांचे विरुध्द  उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान १४ आक्टोबरला आपल्या वकिला मार्फत डॉ. शेंडगे यांनी अटकपूर्व जामीनसाठी उमरगा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सरकारी वकील ॲड. संदिप देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यावर मंगळवारी (दि.२६) जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनुभुले यांनी आपल्या आदेशात डॉ. शेंडगे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.


 
Top