उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मा.भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरस्ती करून ती त्रुटी विरहीत करण्याचा व दि.1 जानेवारी या अर्हता दिनांकानुसार नवीन मतदार नाव नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यकम राबविण्यात येणार आहे.चालू वर्षीच्या पुनक्षिण कार्यक्रमामध्ये 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पुर्ण करणारे नवमतदार यांची नोंदणी  करून मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांच्या बैठकीत आज येथे दिली. 

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधरित  छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमा विषयी ते बोलत होते.

यापूर्वी विषेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गावातील नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नोंदणी तपासणी आणि  नवीन मतदारांनी नाव नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये मतदार यादीच्या  चावडी वाचनाचा उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात येत होती.तथापि , आता हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा याकरिता प्रत्येक गावामध्ये विशेष ग्रामसभेचे आयेाजन येणार आहे.त्यानुसार जिल्हातील सर्व ग्रामपंचायतींनी असे निर्देश देण्यात आले आहेत .

 त्यांनी 16 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुररिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करावयाचे आहे . या विशेष ग्रामसभेमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसंभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी,तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे . तसेच या यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे .गावातील सर्व नागरिकांना मतदार यादीमधील नोंदी तपासून घेण्यात येणारे आहे  . मतदार यादीमधील नोंदणीबाबत नागरिकांना हरकती असल्यास ,नोंदणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवयाचे असल्यास त्यांना विहित अर्ज ( फॉर्म ) तेथेच ग्रामसभेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाने अधीच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाचे नमुने उपलब्ध करून घ्यावयाचे आहेत .या अतंर्गत मयत मतदाराची नवे  वगळणे,कायम स्थलांरीत मतदारांची नवे वगळणे  ,लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलाची नावे वगळणे  तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी करणे  आणि ज्यांच्या वयास  1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करणे आदी कामांवर भर देण्यात येणार आहे .

ग्रामसेवक किंवा संबंधित गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी नागरिकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करावे. याकामासाठी गावकामगार आणि  तलाठी यांनी सहकार्य करावे.नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या   हरकती,आक्षेप,दुरूस्ती वा नोंदणीच्या अर्जाचे यांचे संकलन करून ग्रामपंचायत कार्यालयाने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे पाठवाव्याचे आहे .शक्य असल्यास ग्रामसभेमध्ये नागरिकांना ऑनलाईन नाव नोंदणी nvsp portal/voter helpine app वरून कशी करता येते याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी माहिती द्यावी.नागरिकांना मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदार यादीबाबतचे कामकाज कसे चालते याची माहिती मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) यांनी माहिती द्यावी.नागरिकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी,संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे नाव,संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत.संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांनी दिलेल्या हरकती, आक्षेप,दुरूस्ती वा नोंदणीच्या अर्जाची स्थितीबाबत त्या नागरिकांना कोठून आणि कशी माहिती मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे.

जिल्हातील सर्व ग्रामपंचायतीनी दि.16 नोव्हेंबर 2021 या रोजी संपूर्ण जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुररिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठवावा.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या विशेष ग्रामसभा या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होतील यांची दक्षता घ्यावी आणि तशा सूचना त्यांनी त्यांच्या स्तरावरूनही ग्रामपंचायतीना द्याव्यात.या संदर्भात व्यापक योग्य ती प्रसिध्दी गावपातळीवर होईल यांचीही दक्षता संबंधित पंचायत समित्यांनी घ्यावीत.याबाबतच्या प्रसिध्दीसाठीचा कंटेंट जिल्हा निवडणूक अधिकारी,मतदार नोंदणी अधिकारी,सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावा.यांची प्रसिध्दी प्रत्यक्ष ग्रामसभेच्या 10 दिवस अगोदर करावी,जेणेकरून जास्तीजास्त ग्रामस्थांचा सहभाग वाढेल.

उपस्थित राजकीय पक्षातील पदाधिका-यांना आवाहन करतांना श्री,काळे म्हणाले की 1 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होण-या एकत्रीकृत प्रारूप मतदार यादीचा आपण स्वत: अभ्यास करावा आणि 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती सादर करावे. 13 व 14 नोव्हेंबर आणि 27 व 28 नोव्हेंबर विशेष मोहीमांचा कालवधी असणार आहे.या दिवशी सर्व बूथ अधिकारी मतदार नोंदणी केंद्रांवर उपस्थित राहतील आपल्या दावे आणि हरकतीचे अर्ज त्यांच्याकडे सादर करावे,किंवा आपण नियुक्त केलेल्या बूथ एजंटला सादर करण्यास सांगावे. अर्ज गठ्ठयांच्या स्वरूपात सादर न करता एकावेळी जास्तीत जास्त 10 अर्ज सादर करावे.तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात मतदार मदत केंद्रही कार्यन्वित करण्यात आले आहेत याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा.

उस्मानाबाद जिल्ह्यात शंभर टक्के मतदार ओळखपत्र हे छायाचित्रासहित आहेत. तसेच 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करण्या-या युवा वुवतींनी आपली नावे ऑनलाईन पद्धतीने nvsp portal/voter helpline app ॲप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून करावे.मा. भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट nic.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक निवडणूका शांततेत आणि व्यवस्थितरित्या पार पडल्या आहेत. आगामी जिल्हा परीषद आणि नगर परिषदेच्या निवडणूकीही शांततेत होईल. म्हणून ज्या पात्र नागरिकांनी मतदार यादीसाठी नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी आगामी जिल्हा परीषद आणि नगर परिषदेच्या हि शेवटची संधी असेल . जिल्ह्यातील नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करणे,दुरुस्ती करणे किंवा नाव कमी करून घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.याचा लाभ सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन श्री.काळे यांनी केले.


 
Top