तुळजापूर / प्रतिनिधी-

शारदीय नवरात्र महोत्सवात मंगळवारी सहाव्या दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.

 श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार  अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आर्शीर्वाद दिला म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते. 

तत्पूर्वी रात्री दवीजीची आरती झाल्यानंतर देवीजींच्या मुख्य चादीच्या पादुका नंदी या वाहनामध्ये ठेवून मंदिरास पूर्ण  प्रदर्शना मारण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार, पुजारी बांधव आदींची उपस्थिती होती. उद्या (दि.13 रोजी) श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.



 


 
Top