उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडीचे सुनील दशरथ कदम रविवारी (दि. १०) गावातील चिखली रस्त्यालगत देशी दारुच्या दहा बाटल्यांची अवैध विक्री करताना बेंबळी पोलिसांच्या पथकास आढळून आले.

त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत लोहारा तालुक्यातील धानुरी गावाचे माणिक मनोहर मुसांडे यांना पान टपरीसमोर दहा लिटर गावठी दारू बाळगून असताना लोहारा पोलिसांना दिसून आले. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथील आबासाहेब भगवान जाधव यांच्या शेतात विदेशी दारुच्या पाच छोट्या तर चार मोठ्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


 
Top