उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उत्तर प्रदेश सरकारने द्वेष भावनेतून मौलाना कलीम सिद्दिकी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद शहरातील इमाम कौन्सीलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक १ ऑक्टोंबर रोजी धरणे आंदोलन करून निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली

 या प्रकरणांमध्ये राष्ट्रपती यांनी जातीने लक्ष घालून उत्तर प्रदेशात अल्पसंख्यांक समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावे तरच भारतामध्ये जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता नांदेल व देशात शांततेचे वातावरण निर्माण होऊन प्रगती होईल आपणास विनंती की उत्तर प्रदेश सरकारने मौलाना कलीम सिद्दिकी व त्यांचे सहकारी यांच्यावरील सर्व खोटे आरोप माघारी घेऊन त्यांची मुक्तता करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला आदेश द्यावे अशा प्रकारचे निवेदन राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात  आहे  

    या निवेदनावर  मौलाना ताहेर, जमियात ए उलेमाचे मराठवाडा सरचिटणीस मसूद शेख  हाफिज शेख आलिम, मकसुद खारी, हफिज अल्ताफ कुरेशी मुफ्ती उमर फारूक खमर कुरेशी, मुबारक सिद्दिकी , नगरसेवक आयाज शेख ,इस्माईल शेख, अफरोज पिरजादे , कादर खान ,बिलाल तांबोळी यांच्या सह्या आहेत शहरातील इमाम कौन्सिलचे पदाधिकारी व मुस्लीम बांधव या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.


 
Top