कळंब / प्रतिनिधी-

 तालुक्यात दि.२५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून तात्काळ अनुदानाची पूर्तता करा ह्या मागणीचे निवेदन दि.३० सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना लोकजन शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांनी दिले आहे.

दिलेल्या निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.  शेतकऱ्यांचे काढणीला आलेले सोयाबीन पीक अतिवृष्टी झाल्यामुळे पावसाच्या पाण्याने पाण्यात भिजवून 80 ते 90 टक्के नुकसान झाले आहे,२५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतकरी, बिगर शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घराचे नुकसान झाले आहे,भूमिहीन शेतमजूर यांनी सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून अनेक वर्षांपासून वहीत केलेल्या गायरान जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचा पंचनामा करून अर्थसहाय्य करावे,तहसिल कार्यालयातील संभाव्य विभागात पीडित असलेले प्रस्ताव राष्ट्रीय सामाजिक योजना,इंदीरा गांधी निवृत्ती योजना,संजय गांधी निराधार योजना,ज्येष्ठ नागरिक वेतन योजनेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत,भुमिहान शेतमजूर व अल्पभूधारक सांगायो,इंगायो, श्रावणबाळ,रासायोयोजनेचा लाभ घेण्यासाठी 21000 रुपयांचे प्रमाणपत्र वेळेत मिळावे व महाराष्ट्रातील कोव्हीड-19 मयत व्यक्तींना जाहीर केलेले अनुदान व इतर लाभ देण्यात यावे.

या निवेदनावर बजरंग धावारे,दिनेश पवार,भारत कदम,नीलेश गवळी,रेखा चंदनशिवे, चांदणी सावंत,निलम अंधारे,सुशांत गायकवाड, बाबा टोपे,वामन हजारे, भिवाजी ताकपिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .


 
Top