भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांचे वतीने आज दि. 23/10/2021 रोजी  शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन   पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे यांनी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन अध्यक्ष श्री शशिकांत खुने यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून त्याचा सन्मान केला. समितीचे उपाध्यक्ष श्री धर्मराज सुर्यवंशी यांचा सत्कार भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री राजसिंह राजे निंबाळकर यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून त्याचा सत्कार केला. तसेच समितीचे नुतन सचिव श्री दत्तात्रय साळुंके यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री नेताजी आबा पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून त्याचा सत्कार केला. समितीचे इतर पदाधिकारी कार्याध्यक्ष श्री डाॅ शतानंद दैठणकर, संघटक श्री निशिकांत खोचरे कोषाध्यक्ष श्री विकास जाधव, प्रसिद्धी प्रमुख श्री अशोक गुरव,मनोज शेलार, मिडीया प्रमुख श्री दत्ता जावळे, नितीन वीर, प्रवक्ता रियाज शेख, कायदेशीर सल्लागार अॅड श्री प्रशांत जगदाळे इ.सत्कार समारंभ पार पडला. यावेळी समितीचे पदाधिकारी यांनी विविध प्रश्नांची चर्चा केली. या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री सुनिल काकडे, उपनगराध्यक्ष श्री. अभय इंगळे,अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण सिरसाटे,भाजप  तालुका सरचिटणीस श्री नामदेव नायकल,नगरसेवक श्री प्रवीण पाठक,कुलदीप भोसले, विनोद गपाट, संदिप इंगळे,सागर दंडनाईक इ.भाजप पदाधिकारी व समितीचे श्री. गुंडोपंत जोशी गुरूजी, आबा सुरवसे, सुरज ढेरे,संतोष शेलार, अजय कोळगे, समर्थ मुंडे, महमूद शेख, वैजिनाथ मोरे, संजय बागल, बाबासाहेब गायकवाड, माऊली देशमुख, नवनाथ क्षीरसागर इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top