उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सोमवारी (दि.४) जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्यासोबत अामदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील हे नुकसानग्रस्त भागाची माहिती देणार आहेत. 

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली तर साेयाबीनसह उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी फडणवीस व दरेकर सोमवारी जिल्ह्यात येत आहेत.दोघेही लातूरवरून येत आहेत. या दौऱ्यात दु. १२.२० वा - करजखेडा ता.  उस्मानाबाद  येथे आगमन दु. १.१५ वा. - दाऊतपूर / इर्ला (बेंबळी - चिखली मार्गे) ता. उस्मानाबाद  येथे आगमन व नुकसानीची पाहणी दु. २.१५ वा. - तेर ता.  उस्मानाबाद  येथे आगमन व  नुकसानीची पाहणी ४.२० वा. - आवाडशिरपुरा ता. कळंब येथे आगमन व नुकसानीची  पाहणी

 असा त्यांचा दौरा असणार आहे. दरम्यान दुपारी ४ वाजता तेर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील शेतकरी, नागरीक यांनी या पाहणी दौऱ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले आहे.


 
Top