उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतातील सर्वोत्तम खेळाडूसाठीचा  जानकी पुरस्कार (खो खो ) हा श्रीपतराव भोसले हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी अश्विनी शिंदे हिला मिळाल्याबद्दल त्याचबरोबर श्रीपतराव भोसले हायस्कूलची पूर्ण टीम राष्ट्रीय स्तरावर चांगला खेळ दाखवून त्यापुढे आंतरराष्ट्रीय खेळासाठी त्यांची पुढे  निवड झालेली आहे.  सर्वांची सलेक्शन झाले आहे  त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा   दिल्या व सर्वांच अभिनंदन केलं व   पै. रुषिकेश घाडगे याने हरियाणा येथे झालेल्याऑलम्पिक असोसिएशन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्या बद्दल व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ च्या वतीने सत्कार करण्यात आला.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  चंद्रजित जाधव, संस्थेचे अध्यक्ष .प्रा सुधिर पाटील ,प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत , क्रिडा अधिकारी सारिका काळे ,  मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष  धनंजय रणदिवे , चंद्रसेन देशमुख व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य  पाटील  खेळाडू व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


 
Top