उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन रविवार दि.०३ ऑक्टोबर २०२१ रोजी, मौजे जळकोट ता.तुळजापुर येथे सकाळी १०:०० ते ५:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा नांदुरी व परिसरातील सर्व वयोगटातील ६२५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 या शिबीराचे उद्दघाटन जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, पं.स.सभापती सौ.रेणुकाताई इंगोले व नंदगावच्या सरपंच सौ. सरस्वती कलशेट्टी यांच्या हस्ते झाला. या वेळी पं.स.सदस्य श्री सिध्देश्वर कोरे, वैभव पाटील, सरपंच सिंदगाव विवेकानंद मेलगिरी, मा.सरपंच मधुकर सुतार, बोरगावचे उप सरपंच श्री लक्ष्मण सोमवेशी, मा.उपसरपंच शिवाजी इंगोले, मा.सरपंच सुनिल बनसोडे, मा.चेअरमन धर्मराज तुपे, मलीनाथ गुड्डे, भिमराव चिलगुंडे, कल्याणी कोरे, बलभमी चौगुले, ग्रा.प.सदस्य संगण्णा कट्टे, अप्पा गब्बूरे, मोहन मोरे, हाशांत करंडे, संजय पाटील, करंडे अप्पु, नागनाथ करंडे, पिंटू कोरे, गजानन कुलकर्णी, नागनाथ दणाने, संभा वाघमारे, अष्टविनायक गणेश ग्रुप, दत्तात्रय शेवाळे, सागर चौगुले, इराण्णावाले, अप्पु चिलगुडे,व ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.परवीन सय्यद, डॉ.रोहीत दामोदर, डॉ.अपूर्व दूबे, डॉ.आदर्श यादव, डॉ.रोहीत कोळी, डॉ.निमेश पाटीदार, आ.एच.सी.चे डॉ. सुप्रिया मोकाशे, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, रवी शिंदे, पवन, चव्हाण, शोभा मगर, आशा कार्यकर्त्या जयश्री कामशेट्टी, जयश्री सातलगावकर, ललिता कोळी, लक्ष्मी कोरे, सुरेखा बिराजदार, ईत्यादींदी परीश्रम घेतले.


 
Top