कळंब / प्रतिनिधी- 

शुक्रवार दि .८ आक्टोबर रोजी येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे यांचे अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समिती ची बैठक घेण्यात  आली. यावेळी रूग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. 

या बैठकमध्ये  न.प मार्फत होणारा पाणीपुरवठा गेले सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पेशंट, कर्मचारी, हॉस्पिटल साठी पाणी विकत घ्यावे लागते. सदरील पाणीपुरवठा पुर्ववत चालु करणेसाठी न प प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरले तसेच  रूग्णालयातील स्टाफ, डॉक्टर, कंत्राटी कर्मचारी भरती साठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणे,   ऍडमीट पेशंटला छापील डिस्चार्ज कार्ड आणि फाईल देणे,  लॅबचा रिपोर्ट पेशंटला लवकर व छापील स्वरूपात उपलब्ध करून देणे, स्टाफ व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागु करणे, पेशंट व नातेवाईकांना शुद्ध पाणी उपलब्ध करणेसाठी न प कडे पाठपुरावा करणे,  रूग्णांना सेवा पुरविण्यासाठी रूग्णशुल्कात वाढ करणे ई ठराव घेऊन मंजुरी साठी वरिष्ठांकडे पाठविण्याचे सर्वानुमते ठरले. 

बैठक यशस्वी करण्यासाठी आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे, डॉ. सुधीर आवटे, पं.स विस्तार अधिकारी श्रीमती तावसकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद, सहाय्यक अधिक्षक श्रीमती एल.एच राठोड, परशुराम कोळी, श्री हेड्डा ईनी परिश्रम घेतले. 


 
Top