उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील सर्व सरपंच व ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक तसेच संगणक परिचालक यांना दि.29 ऑक्टोंबर 2021 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह,उस्मानाबाद येथे ई- ग्राम स्वराज्य अंतर्गत 15 व्या वित्त आयोग निधी वितरण संबंधित प्रशिक्षण संपन्न झाले.

पंचायत समिती येथे पंधराव्या वित्त आयोग निधी प्रणालीचे डिजिटल स्वाक्षरीद्वारे कामाच्या खर्चाचे नियोजन कसे करावे तसेच ऑनलाईन पध्दतीने काम कसे केले जाणार आहे.त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.यावेळी प्राविण्य प्रशिक्षक अमोल व्यांकळस यांनी सविस्तरपणे माहिती दिली.

या प्रशिक्षणास पंचायत समिती उस्मानाबादचे उपसभापती प्रदीप तानाजी शिंदे आणि सुरेश तायडे गटविकास अधिकारी सुरेश तायडे  यांची उपस्थिती होती .या प्रशिक्षणासाठी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक तसेच केंद्र परिचालक तालुका विभाग प्रमुख,विस्तार अधिकारी (सर्व) हजर होते.


 
Top