उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता सायकलिंग खेळाचे केंद्र पुणे येथील  बालेवाडीत कार्यान्वित करण्यात आले आहे.सायकलिंग खेळाबाबतची उस्मानाबाद जिल्हयातील खेळाडुंची चाचणी दि.एक नोव्हेंबर 2021 रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे सकाळी 9.00 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

 जिल्हयातील दोन मुले आणि दोन मुली यांची निवड राज्यस्तर निवड चाचण्याकरिता करण्यात येणार आहे.तसेच जे खेळाडू सायकलिंग या खेळात आपल्या जिल्हयातील राज्य आणि राष्ट्रीयस्तर सहभागी झाले आहेत.अशा खेळाडुंना थेट राज्यस्तर चाचण्याकरिता दि.10 नोव्हेंबर 2021 रोजी पुणे येथील बालेवाडी येथे सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत राज्य,राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्राची मूळ प्रत सोबत घेऊन उपस्थिती नोंदवावयाची आहे.

 चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख जानेवारी 2007 ते 2009 दरम्यान असावी.दि.1 नोव्हेंबर 2021 रोजी घेतल्या जाणाऱ्या चाचण्याकरिता उस्मानाबाद जिल्हयातील उत्कृष्ट खेळाडुंनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले आहे.


 
Top