उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोनाच्या संकटामुळे आठ महिन्यांपूर्वी बंद केलेला आठवडी बाजार रविवारपासून (दि. 31) भरविण्यात येणार आहे. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी बोलताना ही माहिती दिली.

 दरम्यान, बाजारात जात असताना प्रत्येक ग्राहकांनी मास्क वापरावा, सॅनिटायझर बाळगावे. सुरक्षित अंतरही ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

उस्मानाबादेत मार्च महिन्यात कोरोनाने डोके वर काढल्यानंतर पालिकेने दर रविवारी भरणारा आठवडी बाजार बंद केला होता. आता कोरोनाचे मळभ बर्‍यापैकी हटले आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही दहाच्या आत आली आहे. त्यातच दिवाळी सण दोन दिवसांवर आल्याने पालिकेने हा बाजार पुन्हा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना नियमावलीचे पालन करुन नागरिकांना आठवडे बाजारात जावे, असे आवाहन नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी केले आहे.


 
Top