तुळजापूर / प्रतिनिधी- 

श्री तुळजाभवानी  मातेच्या  शारदीय नवराञ महोत्सवातील  दुसऱ्या माळे दिनी दि.८ शुक्रवार रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंञी धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे यांनी श्री तुळजाभवानी मातेची यथा सांग पुजा  केली.  या वेळी त्यांचे पारंपारिक पुजारी राम छञे यांनी धनंजय मुंडे परिवाराचा कुलधर्म कुलाचार करवुन आशीर्वाद दिला.

या वेळी माजी आमदार राहुल मोटे त्यांच्या पत्नी वैशाली मोटे,  रा.काँ च्या युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, रा.काँ चे जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर,  रा.काँ शहर अध्यक्ष अमर चोपदार, रा.काँ युवकचे तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, रा.काँ विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळुके, रा.काँ तालुका कार्याध्यक्ष  शरद जगदाळे,  रा.काँ चे नितीन रोचकरी, विकी घुगे, अनमोल शिंदे, अशोक फडतरी,  शिवाजी पवार , ओकांर चोपदार आदीसह रा.काँ चे कार्यकर्ते उपस्थितीत होते.

 
Top